शौर्याचे मूर्तीमंत रूप असलेले महाराणा प्रताप !

२३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी महाराणा प्रताप यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने…

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांच्या सोलापुरातील घरावर प्राप्तीकर विभागाची धाड

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांची देशभरात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह अन्य राज्यांमध्ये अनुमाने २० खाद्यतेल आस्थापने आहेत. करभरणा टाळण्यासाठी त्यांनी रोखीने व्यवहार केल्याविषयी त्यांच्या आस्थापनांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायद्यावर शेतकर्‍यांचे सार्वत्रिक मतदान घ्यावे ! – वि.द. बर्वे, सामाजिक कार्यकर्ते

वि.द. बर्वे यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या शेतकर्‍यांची नावे सात-बाराच्या उतार्‍यावर असतील त्यांनाच मताचा अधिकार देऊन सार्वत्रिक मतदान घेऊन ज्यांची बाजू खरी असेल, हे सिद्ध होऊ द्या. ‘दूध का दूध और पानी का पानी’, ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यांना लाभू द्या.

यवतमाळ येथे अतिक्रमण हटवणार्‍या कर्मचार्‍यावर धर्मांधांकडून आक्रमण !

हा प्रकार इतर कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करणारा आहे. त्यामुळे  आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरपालिका कर्मचारी संघटनेकडून जिल्हाधिकारी एम्. देवेंद्र सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

बनावट ‘फेसबूक पेज’वर कर्जाचे विज्ञापन देऊन महिलेची फसवणूक !

कर्जासाठी ‘स्टॅम्प ड्युटी’ म्हणून २० सहस्र रुपये घेऊन कर्ज न देता त्या महिलेची फसवणूक केली. हा प्रकार ३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सोमाटणे येथे घडला आहे.

राळेगाव येथे पैसे लुटणार्‍या ६ जणांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंद 

तालुक्यातील टाकळी येथील सुरेश मेश्राम यांच्याकडील ६ जणांनी साहित्यासह २७ सहस्र ३०० रुपये लुटून नेले; मात्र राळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही.

अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा विरोध नेहमीच करू ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

पडद्यावर हिरो असलेले अभिनेते खर्‍या आयुष्यात कसे झिरो आहेत, हे दाखवण्यासाठी आम्ही अभिनेते अक्षयकुमार आणि अमिताभ बच्चन यांचा लोकशाही पद्धतीने नेहमीच विरोध करू.

पोलीस असल्याचे खोटे सांगत ५ सहस्र रुपयांची फसवणूक !

पोलीस असल्याचे खोटे सांगून ट्रकची झडती घेत ५ सहस्र रुपये लुटल्याची तक्रार शिरवळ (जिल्हा सातारा) पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. गुन्हेगारांना  पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण !

मुंबईतील हॉटेलमध्ये खासदार मोहनभाई देलकर यांचा मृतदेह आढळला !

या प्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांनी गुजराथी भाषेत लिहिलेली चिठ्ठी येथे आढळली आहे. यात मोठ्या लोकांची नावे आली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी नेटकर्‍यांमध्ये लोकप्रिय असणार्‍या समीर गायकवाडची पुण्यातील रहात्या घरात आत्महत्या

साधनेमुळे आत्मबळ वाढून ताणतणाव, संघर्ष, नकारात्मकता, तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाते येते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आत्महत्यांचे प्रमाण पहाता समाजाला साधना शिकवणे किती अपरिहार्य आहे, हे मनावर बिंबवणारी घटना !