गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण !
सातारा, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – पोलीस असल्याचे खोटे सांगून ट्रकची झडती घेत ५ सहस्र रुपये लुटल्याची तक्रार शिरवळ (जिल्हा सातारा) पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
याविषयी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सद्दाम रुंजा (रा. गुजरात) हे १८ फेब्रुवारी या दिवशी शिरवळ येथून सीमेतून महामार्गावरून ट्रक घेऊन जात होते. २ अज्ञात व्यक्तींनी त्यांचा ट्रक थांबवला. मद्य, गांजा यांची तस्करी होत असल्याने ट्रकची पडताळणी करायची आहे, असा बहाणा करून ट्रकच्या केबिनमध्ये अज्ञातांनी प्रवेश केला. केबिनमध्ये ५ सहस्र रुपये असलेली काळी पिशवी हातचलाखीने घेऊन त्या अज्ञात व्यक्ती पळून गेल्या. याविषयी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.