राळेगाव येथे पैसे लुटणार्‍या ६ जणांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंद 

राळेगाव (यवतमाळ), २२ फेब्रुवारी (वार्ता.) – तालुक्यातील टाकळी येथील सुरेश मेश्राम यांच्याकडील ६ जणांनी साहित्यासह २७ सहस्र ३०० रुपये लुटून नेले; मात्र राळेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. (पोलिसांनी गुन्हा नोंदवून न घेणे म्हणजे चोरांना साथ दिल्यासारखेच आहे. अशा पोलिसांवरच कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक) त्यामुळे सुरेश यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ६ जणांवर दरोड्यासह विविध कलमांअन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.