यवतमाळ येथे अतिक्रमण हटवणार्‍या कर्मचार्‍यावर धर्मांधांकडून आक्रमण !

कायद्याचे भयच न उरलेले उद्दाम धर्मांध !

यवतमाळ, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – शहरातील नगरपालिका कार्यालय आणि शहर पोलीस ठाणे यांच्या जवळ असणार्‍या पाचकंदील चौकात अतिक्रमण हटवल्याचा रागावरून प्रदीप बोचपे (वय ४८ वषेर्र्) या नगरपालिका कर्मचार्‍यावर मोहमद इरफान अब्दुल रेहमान (वय ५० वर्षे), मोहमद नौशाद मोहम्मद इरफान (वय २० वर्षे) आणि शबनम परवीन (वय ४५ वर्षे) या धर्मांध कुटुंबियांकडून २१ फेब्रुवारी या दिवशी लोखंडी सळीने प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या घटनेचा नगरपालिका कर्मचारी संघटनेकडून २२ फेब्रुवारी या दिवशी रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला. हा प्रकार इतर कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करणारा आहे. त्यामुळे  आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरपालिका कर्मचारी संघटनेकडून जिल्हाधिकारी एम्. देवेंद्र सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रकरणी प्रदीप बोचरे यांच्या वैद्यकीय अहवालावरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. मागील ४ दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे.