साधनेमुळे आत्मबळ वाढून ताणतणाव, संघर्ष, नकारात्मकता, तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाते येते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आत्महत्यांचे प्रमाण पहाता समाजाला साधना शिकवणे किती अपरिहार्य आहे, हे मनावर बिंबवणारी घटना !
पुणे – मराठी नेटकर्यांमध्ये लोकप्रिय असणार्या समीर गायकवाड या २२ वर्षीय तरुणाने २१ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता वाघोली येथील केसनंद रस्त्यावरील निकासा सोसायटीमधील घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. तो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध होता. समीर तरुणाईला आवडणार्या शैलीमध्ये वैचारिक संदेश देत असल्याने तो पुष्कळ लोकप्रिय झाला होता.