शौर्याचे मूर्तीमंत रूप असलेले महाराणा प्रताप !

२३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी महाराणा प्रताप यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने…

महाराणा प्रताप यांच्या काळात अकबराने बळ वापरून रजपूत राजांना मांडलिक बनवले. अकबराने मेवाड प्रांत काबीज केला अन् कित्येक रजपूत राजांच्या लेकी-सुनांना स्वतःच्या अंतःपुरात (जनानखान्यात) पत्नी म्हणून ओढले. अशा अत्याचारी अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांनी युद्ध पुकारले. ‘अकबराच्या आज्ञेने राजा मानसिंग आणि अकबरपुत्र सलीम (जहांगीर) महाराणा प्रतापवर चालून गेले. हळदीघाट येथे ही लढाई झाली. यात महाराणा प्रताप यांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांनी स्वतःचा घोडा सहस्रो मुसलमान सैनिकांनी वेढलेल्या सलीमच्या हत्तीवर घातला. ‘चेतक’ घोड्याने सलीमच्या हत्तीच्या सोंडेवर झेप घेऊन आपल्या टापा रोवल्या. विजेच्या वेगाने महाराणा प्रतापचा भाला सलीमच्या कंठाजवळून चमकून गेला. दैव बलवत्तर म्हणून सलीम वाचला. ही लढाई अनिर्णित राहिली. यानंतर हिंदुकुलभूषण महाराणा प्रताप यांनी चितोड वगळता उर्वरित मेवाड प्रांत मोगलांपासून मुक्त केला !’

(संदर्भ : स्वा. सावरकर लिखित ग्रंथ ‘सहा सोनेरी पाने’)