साधकांनो, साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर स्वयंसूचना घ्या आणि साधनेचे प्रयत्न न झाल्यास ‘मनाला जाणीव होईल’, असे प्रायश्चित्त घ्या !
साधनेत अडथळे आणणारे विचार मनात येत असतील, तर त्यावर आपण स्वयंसूचना घ्यायला हव्यात. आपण स्वयंसूचना घेतली नाही, तर त्या विचारांचा आपल्यावर होणारा परिणाम नष्ट होण्यासाठी दिवसभर केलेली साधना खर्ची पडते. स्वयंसूचना घेतल्या, तर मनाला ‘टॉनिक’ मिळते आणि आपण चांगल्या प्रकारे साधना करू शकतो.