आश्रम आणि जिल्हा साठ्यातील कापडी साहित्य पुढील वर्षभर सुस्थितीत रहावे, यासाठी ते ३१.५.२०२० या दिवसापर्यंत उन्हात ठेवण्याचे नियोजन करा !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

सध्या उन्हाळा चालू असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमातील अंथरुणे-पांघरुणे, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य, तसेच लाकडी फर्निचर आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे. लेखासेवकांनी जिल्ह्यातील कापडी फलक, कनाती आदी साहित्यही उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.

कापडांचा रंग जाऊ नये, यासाठी साहित्य आवश्यक तेवढाच वेळ कडक उन्हात ठेवावे, तसेच त्यावर धूळ बसणार नाही, याची काळजी घ्यावी. असे केल्याने पुढे येणार्‍या पावसाळ्यातील दमट हवामानातही साहित्य सुस्थितीत राहू शकते.

सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता साहित्य उन्हात ठेवण्याची सेवा करतांना साधकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे (उदा. एकमेकांमध्ये १ मीटर अंतर ठेवणे, तोंडावर रुमाल अथवा मास्क बांधणे आदींचे) पालन होईल, असे पहावे.