कु. माधुरी दुसे यांना कु. स्वाती गायकवाड यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

कु. स्वाती गायकवाड

१. ‘कु. स्वाती गायकवाड सत्संगाची सिद्धता करतांना आधी ‘इतरांना काय वाटते’, अशी सूत्रे घेऊन सत्संग चालू करते. एकदा राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगामध्ये सूत्रे सांगतांना तिने उत्स्फूर्तपणे म्हटले, ‘भावविश्‍वातील भावक्षण हे अनुभवण्याला द्याल का हो सद्गुरुराया ।’ त्या दिवसापासून तिचे हे वाक्य म्हणताच माझी भावजागृती होते.’

२. एखाद्या साधकाकडून बोलतांना चुकले, तरी त्याला ती मध्येच न थांबवता साधकाचे बोलणे पूर्ण ऐकून घेते आणि नंतर योग्य ते साधकाला सांगते.

३. तिला कुणीही मध्येच काही प्रश्‍न विचारला, तर ती लगेच उत्तर देते किंवा समोरच्याचे पूर्ण ऐकून घेते.

‘गुरुमाऊली, स्वातीताईचे हे गुण माझ्यात येण्यासाठी प्रयत्न करवून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०१६)