गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी केंद्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील खाणी पुन्हा चालू करण्याविषयी केंद्रशासन सकारात्मक असून याविषयी कायद्याच्या आणि न्यायालयीन दृष्टीकोनातून तोडगा काढण्याचा विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘मी गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अमित शहा खाणींविषयी गोव्यातील जनतेला साहाय्य करण्यास सकारात्मक आहेत. या आठवड्यात देहली येथे खाणींविषयी आणखी २ बैठका होणार आहेत, तसेच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीही चालू राहील.’’