नामवंत सराफ व्यावसायिक किशोर पंडित यांचे निधन
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक, पंडित ज्वेलर्सचे किशोर पंडित यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक, पंडित ज्वेलर्सचे किशोर पंडित यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले.
खानापूर शहरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणाला भाजप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती बंद केली असून त्याच्याशी संबंधित इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे.
चीनने घुसखोरी करत भूतानमध्ये पांगडा नावाचे एक गावच वसवले आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बृहन्मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद रहातील, असा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
मुंबईसह उपनगरांमध्ये १२ ऑक्टोबर या दिवशी वीजपुरवठा तांत्रिक कारणामुळेच खंडित झाला होता, असा अहवाल आयआयटी मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी.जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिला आहे.
खोडद (तालुका जुन्नर) येथील २ अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी ४ जणांना कह्यात घेतले असून जुन्नर न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जगभरातील विविध आजारांच्या साथींचा संसर्ग पुण्यात सातत्याने दिसत आहे. स्वाइन फ्लू पाठोपाठ आता ११ वर्षांनंतर कोरोना महामारीची साथ पुणे येथे मुंबईपेक्षा अधिक तीव्रतेने आहे. त्यामुळे पुण्यात साथरोग रुग्णालय होणे अत्यंत आवश्यक आहे.
येथील राजपूत करणी सेनेने ‘बिग बॉस १४’ ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. या मालिकेत एजाज खान आणि पवित्र पुनिया हे एकमेकांवर प्रेम करत असून त्यांची आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात येत आहेत.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना १९ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.