ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करा ! – मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासन म्हणून स्थानिक प्राधिकरणातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची नियुक्ती करा, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यालयाने दिला आहे.

ऑक्सफर्डसह भारतीय लसीसाठीही सीरमचे संशोधन ! – सायरस पूनावाला

कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापिठातील लसीसह आणखी ४ लसींसाठी सीरम इन्स्टिट्यूटने करार केले आहेत. सीरमने भारतीय संशोधकांच्या साहाय्याने संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोवॅक्स लसीवर काम चालू केले आहे. – सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला

हुपरी (कोल्हापूर) शहरातील आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगराध्यक्षांची मागणी

जिल्ह्यातील हुपरी शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्टिंग किटची सुविधा आणि स्वॅब कलेक्शन केंद्र तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांनी केली आहे.

अकलूजजवळ अलगीकरणातील निवृत्त साहाय्यक फौजदाराचे घर चोरट्यांनी लुटले

अकलूजजवळील माळीनगर येथे कोरोनाबाधित सेवानिवृत्त साहाय्यक फौजदार आणि त्यांचे कुटुंबीय अलगीकरण कक्षात होते. या संधीचा अपलाभ घेऊन चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पळवले आहेत.

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया लोकशाहीला मारक ! – समरजितसिंह घाटगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, भाजप

सत्ताधारी राजकीय पक्ष हस्तपेक्ष करून गावाची सत्ता आपल्या कह्यात रहाण्याच्या हेतूने प्रशासक नियुक्तीचे निर्देश देत आहेत, हे लोकशाहीला मारक आहे.

३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार्‍या सीईटी परीक्षेसाठी कर्नाटक शासनाची मार्गदर्शक तत्त्वे घोषित

३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार्‍या सीईटी परीक्षेसाठी कर्नाटक परीक्षा विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकप्रतिनिधींनी अखंड सावध रहाणेच आवश्यक !

कोरोना महामारीच्या काळात विविध ठिकाणी भेटी देणार्‍या लोकप्रतिनिधींसमवेत कार्यकर्त्यांचा गोतावळा असतो, तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असतात. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह जनतेनेही सावध राहून शासनाने सांगितलेले नियम पाळणे आवश्यक आहे.

पुणे जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी केवळ दंडात्मक कारवाई

दळणवळण बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद असतांनाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध उत्खनन आणि वाहतूक चालू आहे. यावर कारवाई करत जिल्हा प्रशासनाकडून दोन मासांत १७ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे.

विद्युत् आस्थापनांच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रहित

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणाशीही चर्चा न करता विद्युत् आस्थापनांवर अशासकीय व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. पक्षश्रेष्ठींकडे तक्रार गेल्यावर राऊत यांनी या नियुक्त्या रहित केल्या आहेत.

समाजकंटकांकडून बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयावर दगडफेक, रुग्णवाहिका जाळली

जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त समाजकंटकांनी २२ जुलैच्या रात्री रुग्णालयासमोर थांबलेली रुग्णवाहिंका जाळली. जमावाने येथील पोलीस हवालदारास मारहाण करून पोलीस वाहन, बंदीवानांचे वाहन आणि रुग्णालय यांवर दगडफेक केली.