३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार्‍या सीईटी परीक्षेसाठी कर्नाटक शासनाची मार्गदर्शक तत्त्वे घोषित

बेळगाव – ३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार्‍या सीईटी परीक्षेसाठी कर्नाटक परीक्षा विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत.

१. या परीक्षेसाठी इतर विभागांच्या अधिकार्‍यांचे साहाय्य घेतले जाणार असून बेळगाव जिल्ह्यातील १४, चिक्कोडी येथील ३ आणि खानापूर वगळता प्रत्येक तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे.

२. या काळात विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याआधी १ घंटा परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

३. विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहिल्याने सामाजिक अंतर राखण्यास आणि अन्य उपाययोजना करण्यास साहाय्य होणार आहे.

४. ३० जुलै या दिवशी सकाळी १०.३० ते ११.५० या वेळेत जीवशास्त्र, दुपारी २.५० ते ३.५० या वेळेत गणित आणि ३१ जुलै या दिवशी सकाळच्या सत्रात पदार्थविज्ञान (भौतिकशास्त्र), तर दुपारच्या सत्रात रसायनशास्त्र या विषयांच्या परीक्षा होणार आहेत.