कर्तेपणा घेणे हा अहंचा पैलू नष्ट होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांच्या संदर्भात रामनाथी आश्रमात श्री जगन्नाथ देवतेच्या मूर्तीस्थापनेचा सोहळा चालू असतांना आलेल्या अनुभूती !

मी कुठलीही सेवा केल्यावर माझ्यातील कर्तेपणा घेणे या तीव्र अहंच्या पैलूमुळे माझ्या मनात कर्तेपणाचे विचार येत असत. आमच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्याने आता पूर्वीच्या तुलनेत मनात कर्तेपणाचे विचार येण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

सांगलीत ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची हत्या

दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार पहाता सध्याचे कायदे पुरसे नसून आरोपींना धाक वाटावा अशा कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच वारंवार होणार्‍या घटना महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, हेच अधोरेखित करतात !

निधर्मीवादी याचा विरोध कधी करणार ?

तिरुपत्तूर (तमिळनाडू) येथील एलापल्ली गावामध्ये हिंदूंच्या २५० वर्षे प्राचीन असणार्‍या अम्मान मंदिराच्या सर्व भिंतींवर आणि फरशांवर ख्रिस्त्यांचा क्रॉस रेखाटण्यात आला असून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यासाठी विभागीय आयुक्तांचा शासनाकडे प्रस्ताव

औरंगाबाद जिल्ह्याचे शासनाकडून अधिकृतरीत्या संभाजीनगर असे नामकरण करावे, यासाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

‘सुभद्रा लोकल एरिया’ बँकेची केंद्र सरकारकडे असलेली १६ कोटी रुपयांची गुंतवणूक सुरक्षित

रिझर्व्ह बँकेने ‘सुभद्रा लोकल एरिया’ या बँकेचा परवाना रहित केला असला, तरी सुभद्राची १६ कोटी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बँकेकडे असलेल्या ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवीही सुरक्षित आहेत.

यज्ञनगरी शिवपुरीच्या उत्पादनांना देश-विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी !

विश्‍व फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे यज्ञनगरी शिवपुरी येथे वेद आणि आयुर्वेद यांचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवपुरी परिसरातील एकूण ३२ महिलांना उदबत्ती उत्पादन करणार्‍या उद्योगात वर्षभर रोजगार उपलब्ध होत आहे.

मुंबईतून १ कोटी ४० लाखांचे अमली पदार्थ कह्यात

परदेशी नागरिक अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले आणि त्यांनी स्थानिक माहिती गोळा केली.

अजानची स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास मी विरोध दर्शवला ! – पांडुरंग सकपाळ, विभागप्रमुख, शिवसेना

मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेने अजानची सार्वजनिकरित्या स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून देत स्पर्धा सार्वजनिकरित्या आयोजित करण्यास विरोध दर्शवला, असे स्पष्टीकरण दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले.