अग्नीशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव कार्यालयातून पुढे गेला नसल्याचे उघड

भंडारा येथील रुग्णालयात ‘इनक्युबेटर’जवळ नर्स असणे बंधनकारक असतांना ही घटना घडली तेव्हा नर्स या कक्षात नसल्याची माहिती पुढे येत आहे.

तीन वर्षे हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यानंतर सातारा नगरपालिका पुन्हा या वर्षी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सेवा पुरस्कार’ वितरणासाठी प्रयत्नशील

ज्यांच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि ज्यांच्या संस्थेचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप होतात, त्यांच्या नावाने नगरपालिकेला पुरस्कार का द्यावासा वाटतो ?

अभिनेता सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सोनू सूद यांच्या इमारतीवरील कोणत्याही कारवाईवर १३ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या समवेत बैठक घेणारा पोलीस हवालदार निलंबित

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एस्.बी.आय.च्या प्रवेशद्वारावर ५ ऑक्टोबर या दिवशी व्यावसायिक राजेश कानाबार यांची आर्थिक वादातून हत्या झाली होती.

लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत अदखलपात्र गुन्हा नोंद

भालचंद्र नेमाडे यांच्या वर्ष २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांविषयी दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाळू चोरी प्रकरणातील ६ जण पंढरपूर तालुक्यातून हद्दपार

अनेक गुन्हे नोंद केल्यानंतरही वाळू चोरी करणार्‍या ६ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी हे आदेश काढले आहेत.

इतिहासात प्रथमच नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडेरायाची यात्रा रहित

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाची यात्रा कोरोनामुळे इतिहासात प्रथमच रहित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून व्यापार्‍यांना प्रदर्शन न लावण्याचे आदेश दिले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित करण्यात आली असून आता ‘पास’विना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी शेळ-मेळावली येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

‘अलीबाबा’ लुटणारे ‘चिनी’ चोर !

‘अलीबाबा आणि चाळीस चोरां’च्या कथेचा आस्वाद आपल्यापैकी बर्‍याच जणांनी लहानपणी घेतला असेल. आता ‘अलीबाबा आणि ‘चिनी’ चोरा’च्या कथेला आरंभ झाला आहे. या कथेचाही राष्ट्रप्रेमी भारतियांनी आस्वाद घ्यावा; कारण वेळ, शक्ती, पैसा न वापरता शत्रूचे स्वतःच्या कर्माने अधःपतन होत असेल, तर ते कुणाला नको आहे ?