राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘सर्व्हर’मधील फेरफारीच्या प्रकरणी सीबीआयकडून भारतात १८ ठिकाणी धाडी

याच प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सध्या चौकशी चालू आहे.

बांगलादेशमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी !

भारताने तेथील शेख हसीना सरकारला जाब विचारला पाहिजे ! जर भारत सरकार निष्क्रीय राहिले, तर ‘बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारास एकप्रकारे भारत सरकारच उत्तरदायी आहे’, असे कुणी आरोप केल्यास त्यात चूक ते काय ?

चिनी आस्थापन ‘विवो’ने कर चुकवून चीनमध्ये अवैधरित्या पाठवले ६२ सहस्र ४७६ कोटी रुपये !

सहस्रो कोटी रुपयांचा कर चुकवेपर्यंत आणि ते पैसे चीनला पाठवेपर्यंत भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ? असे आणखी किती विदेशी आस्थापने करत असतील, याची माहिती या यंत्रणा घेत आहेत का ?

जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येच्या प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकार्‍याला २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

जॉर्ज फ्लॉयड यांनी एका आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या वेळी चाउविन याने त्याला पकडले आणि साडेनऊ मिनिटे त्यांच्या मानेवर स्वतःचा गुडघा ठेवून ती दाबून ठेवली. यात फ्लॉयड यांचा मृत्यू झाला.

भाजपकडून हरियाणातील पदाधिकार्‍याची हकालपट्टी

वर्ष २०१७ मध्ये महंमद पैगंबर यांच्याविरुद्ध ट्ीवट केल्याच्या प्रकरणी भाजपने हरियाणातील पक्षाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अरुण यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली. भाजपचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष ओ.पी. धनखड यांनी ही कारवाई केली.

माझे पूर्वज हिंदू होते; मात्र हिंदूंच्या छोट्या समुहाच्या अत्याचारांमुळे त्यांनी इस्लाम स्वीकारला ! – आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल

दोन दिवसांपूर्वी अजमल यांनी बकरी ईदच्या दिवशी गोहत्या न करण्याचे आवाहन मुसलमानांना केले होते.

(म्हणे) ‘पत्रकारांना कारागृहात डांबू नका !’  

ऊठसूठ कुठलाही देश भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांत नाक खुपसतो, यावरून ‘अशा देशांवर भारताचा वचक नाही’, हे स्पष्ट होते. त्यामुळे भारत सरकारने ‘इतर देश भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांत नाक खूपसण्याचे धाडस करणार नाही’, अशी पत भारताने जगात निर्माण केली पाहिजे !

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना २६ वर्षांनंतर २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्‍यांना मारहाण केल्याचे प्रकरण
२६ वर्षांनंतर मिळणार न्याय हा अन्यायच आहे, असे म्हटले, तर चुकीचे काय ?

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या नासीर याला अटक

देशात कायदा असतांना अशा प्रकारची धमकी देणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणाला अशी धमकी देण्याचे त्यांचे धाडस होणार नाही !

‘आक्षेपार्ह व्हिडिओ बनवतांना मी मद्यधुंद होतो’, असे सांग, म्हणजे तुला वाचवता येईल !

अमजेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत यांचा आरोपी सलमान चिश्ती याला ‘सल्ला’
सारस्वत यांची पदावरून हकालपट्टी
चिश्ती याने आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे नूपुर शर्मा यांच्या शिरच्छेदाची दिली होती धमकी