चिनी आस्थापन ‘विवो’ने कर चुकवून चीनमध्ये अवैधरित्या पाठवले ६२ सहस्र ४७६ कोटी रुपये !

नवी देहली – चिनी भ्रमणभाष आस्थापन ‘विवो’ने कर चुकवण्यासाठी अवैधरित्या ६२ सहस्र ४७६ कोटी रुपये चीनला पाठवल्याचे समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) ही माहिती दिली. ‘विवो’ने चीनला पाठवलेली रक्कम ही त्याच्या भारतातील एकूण उलाढालीच्या म्हणजे १ लाख २५ सहस्र १८५ कोटी रुपयांच्या निम्मी आहे. वर्ष २०१८ ते २०२१ या काळात भारत सोडून चीनला गेलेले ३ चिनी नागरिक आणि आणखी १ चिनी नागरिक यांच्या अन्वेषणाच्या वेळी ‘विवो’ची करचुकवेगिरी उघड झाली. या सर्वांच्या नावे भारतात २३ आस्थापने आहेत. त्या चौघांनाही नितीन गर्ग नावाच्या सनदी लेखापालने साहाय्य केले होते.

संपादकीय भूमिका

सहस्रो कोटी रुपयांचा कर चुकवेपर्यंत आणि ते पैसे चीनला पाठवेपर्यंत भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ? असे आणखी किती विदेशी आस्थापने करत असतील, याची माहिती या यंत्रणा घेत आहेत का ?