(म्हणे) ‘पत्रकारांना कारागृहात डांबू नका !’  

झुबेर प्रकरणावरून जर्मनीकडून भारताला फुकाचा सल्ला

बर्लिन – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा ‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद झुबेर याला अटक केल्याच्या सूत्रावरून जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला ‘पत्रकारांना कारागृहात डांबू नका आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राखा’, असा फुकाचा सल्ला दिला. जर्मनीने म्हटले आहे, ‘‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि माध्यमस्वातंत्र्य यांसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. जगभरात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. ते अबाधित रहायला हवे. हा नियम भारतालाही लागू आहे.’’

जर्मनीने चुकीच्या माहितीवर आधारित विधाने टाळायला हवीत

जर्मनीच्या आगाऊपणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ‘जर्मनीने चुकीच्या माहितीवर आधारित विधाने टाळायला हवीत’, असे विधान केले.

संपादकीय भूमिका

ऊठसूठ कुठलाही देश भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांत नाक खुपसतो, यावरून ‘अशा देशांवर भारताचा वचक नाही’, हे स्पष्ट होते. त्यामुळे भारत सरकारने ‘इतर देश भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांत नाक खूपसण्याचे धाडस करणार नाही’, अशी पत भारताने जगात निर्माण केली पाहिजे !