इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता !

देशातील पेट्रोलचे मूल्य १०० रुपयांपर्यंत पोचले असतांना आता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘ओपेक’ या कच्च्या तेलाच्या पुरवठादार देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवायला तूर्तास नकार दिला आहे.

मद्यालये, बार आदींना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी कायदा करावा !

‘हे अशासकीय विधेयक सभागृहात चर्चेसाठी घेण्यात यावे’, यावर सभागृहात बहुमताने संमती देण्यात आली. त्यामुळे हे विधेयक पुढील अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.

मृत्यू संशयास्पद असल्याने प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे चौकशी करावी ! – देवेंद्र फडणवीस

मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी ५ मार्च या दिवशी दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. अखेरीस या प्रकरणारचा तपास आतंकवादविरोधी पथकाकडे सोपवल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे आधुनिक वैद्य बडतर्फ

महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्याने ‘पॉझिटिव्ह’ महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याचे संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी सांगितले.

भारतीय वंशांच्या लोकांनी अमेरिकेमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनामध्ये आतापर्यंत भारतीय वंशाच्या ५५ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.

लातूर शहरासह आसपासच्या काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू !

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा, तसेच अहमदपूर नगरपालिका परिसरात २ मार्चच्या रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

काम बंद असतांना पाण्याचे नमुने घेऊन अहवाल सादर करणार्‍या पुरातत्व विभागाला नमुने पुन्हा घेऊन अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश

‘हिंदूंचे आराध्यदैवत प्रभु श्रीराम यांनी निर्माण केल्याचा इतिहास असलेला वाळकेश्‍वर येथील बाणगंगेचा जलस्रोेत विकासकांनी केलेल्या खोदकामामुळे बाधित झाला आहे.

गोध्रा हत्याकांडाप्रकरणी नरेंद्र मोदी क्षमा मागतील का ? – नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

राहुल गांधी यांनी चुकीविषयी क्षमा मागितली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र काँग्रेसने केलेल्या चुकीविषयी जर खरोखरच त्यांना पश्‍चात्ताप वाटत असेल, तर त्यासाठी काँग्रेस काय प्रायश्‍चित्त घेणार ? हेही त्यांनी सांगणे अपेक्षित आहे.

पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पैसे घेऊन मतिमंद मुलीवरील बलात्काराचे प्रकरण दडपले !

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार रामदास कदम यांचा विधान परिषदेत गंभीर आरोप

विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ !

अर्णव गोस्वामी अन् अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात ७ सप्टेंबर २०२० या दिवशी प्रविष्ट केलेले हक्कभंग, तसेच अवमान प्रकरणाचा विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे