बांगलादेशमध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी !

ढाका – ‘बांगलादेशच्या ठाकूरगाव जिल्ह्यात इस्लामी कट्टरतावाद्यांनी हिंदूंचा नरसंहार करण्याची चिथावणी दिली आहे. ‘निर्मल’ नावाच्या एका हिंदु मुलाने इस्लामचा कथित अवमान केल्याचा आरोप करत आतंकवाद्यांनी ही चिथावणी दिली आहे.

त्यामुळे ठाकूरगाव जिल्ह्यातील हिंदूंमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे’, अशी माहिती देणारे ट्वीट ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्याने केली आहे.

या ट्वीटसमवेत जोडलेल्या व्हिडिओमध्ये मुसलमान बोलतांना दाखवण्यात आले आहेत. त्यात ते म्हणत आहेत, ‘‘कुराण म्हणते की, ‘जो कुणी महंमद पैगंबराचा अवमान करील, त्याची हत्या केली जाईल. जर प्रशासन त्याच्या विरोधात कारवाई करत नसेल, तर आम्ही सर्व हिंदूंची हत्या करणार !’

संपादकीय भूमिका

भारत सरकारने बांगलादेशात असे काही होण्याआधीच तेथील शेख हसीना सरकारला जाब विचारला पाहिजे ! जर भारत सरकार निष्क्रीय राहिले, तर ‘बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारास एकप्रकारे भारत सरकारच उत्तरदायी आहे’, असे कुणी आरोप केल्यास त्यात चूक ते काय ?