काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना २६ वर्षांनंतर २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकार्‍यांना मारहाण केल्याचे प्रकरण

चित्रपट अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – चित्रपट अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना सरकारी कार्यात अडथळा आणणे आणि मारहाण करणे, या गुन्ह्यांसाठी न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची, तसेच ८ सहस्र ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली; मात्र नंतर त्यांना जामिनावर सुटका करण्यात आली. या सुनावणीच्या वेळी राज बब्बर न्यायालयात उपस्थित होते. राज बब्बर यांनी २ मे १९९६ या दिवशी निवडणुकीच्या वेळी निवडणूक अधिकार्‍यांना  मारहाण केली होती. त्या वेळी ते समाजवादी पक्षाचे उमेदवार होते.

संपादकीय भूमिका

२६ वर्षांनंतर मिळणार न्याय हा अन्यायच आहे, असे म्हटले, तर चुकीचे काय ?