भाजपकडून हरियाणातील पदाधिकार्‍याची हकालपट्टी

महंमद पैगंबर यांच्याविरुद्ध वर्ष २०१७ मध्ये केले होते ट्ीवट

अरुण यादव

नवी देहली – वर्ष २०१७ मध्ये महंमद पैगंबर यांच्याविरुद्ध ट्ीवट केल्याच्या प्रकरणी भाजपने हरियाणातील पक्षाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अरुण यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली. भाजपचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष ओ.पी. धनखड यांनी ही कारवाई केली. यादव यांचे वर्ष २०१७ मधील ट्ीवट सध्या सर्वत्र प्रसारित होत आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी सामाजिक माध्यमांवर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने याच कारणामुळे नूपुर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

यादव यांच्याविरुद्ध अद्याप पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली नाही. ‘जर एका ट्ीवट वरून ‘अल्ट न्यूजचा सहसंस्थापक महंमद जुबेर याला अटक होऊ शकते, तर अरुण यादव आणि नूपुर शर्मा यांना का नाही ?’, असा प्रश्‍न ट्वीटरद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.