‘आक्षेपार्ह व्हिडिओ बनवतांना मी मद्यधुंद होतो’, असे सांग, म्हणजे तुला वाचवता येईल !

  • अमजेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत यांचा आरोपी सलमान चिश्ती याला ‘सल्ला’

  • सारस्वत यांची पदावरून हकालपट्टी

  • चिश्ती याने आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे नूपुर शर्मा यांच्या शिरच्छेदाची दिली होती धमकी

अमजेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत (डावीकडे)

जयपूर – अजमेर दर्ग्याचा सेवेकरी सलमान चिश्ती याने ‘नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करणार्‍याला स्वतःचे घर देणार’, असे चिथावणीखोर आवाहन केले होते. या आवाहनाचा त्याने व्हिडिओ बनवला होता. याविषयी विरोध झाल्यानंतर अजमेरचे पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत यांनी चिश्ती याला अटक केली. त्याला अटक करून घेऊन जात असतांनाचा एक व्हिडिओ भाजपच्या नेत्याने प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस उपायुक्त संदीप सारस्वत हे चिश्ती याला ‘आक्षेपार्ह व्हिडिओ बनवतांना मी मद्यधुंद होतो’, असे सांग, म्हणजे तुला वाचवता होईल’, असा सल्ला देतांना दिसत आहेत. यानंतर पोलिसांनी ‘चिश्ती मद्यधुंद अवस्थेत होता’, असे पसरवले होते.

या घटनेमुळे सारस्वत यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या त्यांना पदाच्या प्रतीक्षेत असणार्‍यांच्या सूचीत अंतर्भूत करण्यात आले आहे. राजस्थान सरकारने सारस्वत या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा पोलिसांची पदावरून केवळ हकालपट्टी करणे पुरेसे नसून त्यांच्या विरोधात खटला चालवून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे !
  • असे पोलीस भारताचे कि पाकचे ? हिंदूचा शिरच्छेद करण्याची भाषा करणार्‍या कट्टरतावादी मुसलमानाला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याऐवी त्याला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतात, यासारखी संतापजनक गोष्ट काय असेल ? असे पोलीस कट्टरतावाद्यांनी अराजक माजवल्यावर हिंदूंचे रक्षण काय करणार ?
  • राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेत असल्यामुळे अशा पोलिसांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको !