नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या नासीर याला अटक

अटक करण्यात आलेला आरोपी नासीर

बरेली (उत्तरप्रदेश)- नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करून हत्या करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नासीर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. एका व्हिडिओद्वारे नासीर याने ही धमकी दिली होती. नासीर शिवणकाम करतो. काही दिवसांपूर्वी काही जण त्याच्याकडे कपडे शिवण्यासाठी गेले असता त्यांचा नूपुर शर्मा यांच्या प्रकरणावरून वाद झाला. तेव्हा नासीर याने ‘नूपुर शर्मा यांना माझ्यासमोर आणल्यास मी तिचा शिरच्छेद करीन’, अशी धमकी त्याने दिली. काहींनी याचे चित्रीकरण करून व्हिडिओ बनवला आणि तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. तो पाहून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंद करून नासीर याला अटक केली.

संपादकीय भूमिका

देशात कायदा असतांना अशा प्रकारची धमकी देणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणाला अशी धमकी देण्याचे त्यांचे धाडस होणार नाही !