लहान मुलांना घेऊन लोकल रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यास मनाई 

मुंबई – सद्यस्थितीत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अधिवक्ता, डबेवाले यांसह महिलांना लोकल रेल्वे गाड्यांतून प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना घेऊन प्रवास करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढले असल्याचे रेल्वे प्रशासनाला आढळून आले आहे. लहान मुलांमुळे गर्दी वाढत असून त्याहीपेक्षा हे लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याच्या कारणास्तव लोकल रेल्वे गाड्यांतून लहान मुलांना घेऊन प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. याविषयीचा आदेश रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आला आहे.