२८ नोव्हेंबरपासून प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन !

पंढरपूर – कार्तिकी यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २५ ते २७ नोव्हेंबर असे ३ दिवस पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन बंद करण्यात आले होते; मात्र २८ नोव्हेंबरपासून प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी दिली. ३ डिसेंबरअखेर प्रतिदिन सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत हे दर्शन देण्यात येणार आहे. ४ डिसेंबरनंतर ऑनलाईन मुखदर्शन पाससाठी मंदिर समितीकडून स्वतंत्र वेळापत्रक घोषित करण्यात येणार आहे.