समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांना प्रसंगी अटक करू ! – पर्यटनमंत्री आजगावकर

समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि आवश्यकता भासल्यास त्यांना अटकही केली जाणार आहे.

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी उशिरा अबकारी, वित्त आणि इतर खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना दिली.

धवडकी येथील दत्तमंदिरातील ३ समयांची चोरी

तालुक्यातील धवडकी येथील श्री दत्तमंदिरातील २५ सहस्र रुपये किमतीच्या ३ समया चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

गणेशोत्सव काळात घेण्यात येणारी पोटनिवडणूक रहित करून अन्य कालावधीत घेण्याची मागणी

भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगळुरूमधील रिसॉर्टवर आयकर खात्याची धाड

पक्षातून फुटून जाऊ नयेत म्हणून गुजरातमधील काँग्रेसच्या ४४ आमदारांना बेंगळुरू येथील इगलटोन या रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे. या रिसॉर्टवर आयकर खात्याने २ ऑगस्टच्या दिवशी धाड घातली.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या वतीने अर्ज भरला !

विधानसभा पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघातून भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २ ऑगस्ट या दिवशी उमेदवारी अर्ज भरला.

कळसा-भंडुरा प्रकल्प म्हणजे पर्यावरण टाइमबॉम्ब ! – मुख्यमंत्री पर्रीकर

कर्नाटक शासनाचा कळसा-भंडुरा प्रकल्प पर्यावरणाला अतिशय घातक आहे. हा प्रकल्प म्हणजे एक पर्यावरण टाइमबॉम्ब आहे, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले.

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करणार ! – मंत्री सुदिन ढवळीकर

गोव्यातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त होणार, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत दिले.

मडकई दफनभूमीतील क्रॉसच्या तोडफोडीच्या प्रकरणी संशयित सापडला

करंझाळ, मडकई येथील फातिमा चॅपलच्या दफनभूमीतील क्रॉसच्या तोडफोडीच्या प्रकरणी चौकशी करत असलेल्या दक्षिण गोवा पोलीस पथकाला संशयित सापडला आहे.

वाहतुकीस अडथळा ठरल्याच्या कारणावरून संभाजीनगर येथे प्रशासनाने श्री दुर्गादेवीचे मंदिर पाडले

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत येथील ४० वर्षे जुने असलेले अनधिकृत श्री दुर्गादेवीचे मंदिर पाडण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now