विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर जिहाद्यांकडून जल्लोष !

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव

नवी देहली – विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे २१ सप्टेंबर या दिवशी देहलीतील रुग्णालयात निधन झाले. स्वतःच्या विनोदी शैलीने जगाला हसवणारे श्रीवास्तव ‘उत्तरप्रदेश फिल्म डेव्हलपमेंट परिषदे’चे अध्यक्षही होते. एकीकडे श्रीवास्तव यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असतांना दुसरीकडे मुसलमान जिहादी जल्लोष करण्यात मग्न आहेत. सामाजिक माध्यमांवर हे जिहादी त्यांच्या मृत्यूचा जल्लोष करत आहेत.

मुल्ला इब्राहिम नावाच्या मुसलमान व्यक्तीने ट्विटरवर ‘राजू श्रीवास्तव कट्टरवादी होता. तो वर्णद्वेषी आणि इस्लामविरोधी होता’, असे ट्वीट केले आहे. वसीम अक्रम याने, ‘आयुष्याचा शेवटच्या टप्प्यात राजू श्रीवास्तव यांनी मुसलमानांना शिवीगाळ केली. त्यांच्या विनोदी चेहर्‍यामागे एक सैतान लपलेला होता’, असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनीही शोक व्यक्त केला. राजपाल यादव, किकू शारदा, हृतिक रोशन, सोनू सूद, अनुपम खेर आणि कैलाश खेर या कलाकारांनीही शोक व्यक्त केला.

संपादकीय भूमिका

असे जर हिंदूंनी केले असते, तर समस्त निधर्मीवादी, मानवाधिकारवाले आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंवर टीका केली असती. येथे जल्लोष करणारे ‘एका विशिष्ट समाजा’चे असल्यामुळे सर्व शांत आहेत !