कर्नाटकमध्ये बाँबस्फोट घडवू पहाणार्‍या इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांना शिवमोग्गा येथून अटक !

तिघांपैकी विद्युत् अभियंता असलेला आतंकवादी हा त्यांचा नेता !

शिवमोग्गा (कर्नाटक) – कर्नाटक पोलिसांनी येथून इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांना अटक केली आहे. ‘हे तिघेही राज्यात मोठ्या तीव्रतेचा बाँबस्फोट करण्याच्या सिद्धतेत होते’, अशी माहिती पोलिसांना गुप्तचर संस्थेच्या माध्यमातून मिळाली होती. शारिक, माजी आणि सैयद यासीन अशी तिघांची नावे असून यांच्यातील एक हा विद्युत् अभियंता असून तो त्यांचा नेता आहे.

१. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्लामिक स्टेटच्या सांगण्यानुसार या तिघांनी आतंकवादी प्रशिक्षण प्राप्त केले होते. ते शिवमोग्गा आणि तीर्थहळ्ळी येथील असून त्यांचा संबंध मंगळुरूशी आहे.

२. शिवमोग्गा हे राष्ट्रघातकी कारवायांचे केंद्र बनले आहे. गेल्या मासात १५ ऑगस्टला शिवमोग्गा येथेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भित्तीपत्रके फाडण्यात आली होती, तसेच राष्ट्रध्वजाचाही अवमान करण्यात आला होता. हे कृत्य करणारे धर्मांध मुसलमान टीपू सुलतान आणि महंमद अली जिना यांची भित्तीपत्रके लावण्याचा प्रयत्न करत होते. येथेच प्रेम सिंह नावाच्या हिंदु व्यक्तीवर चाकूद्वारे आक्रमणही करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • ‘मुसलमान तरुणांना मुख्य प्रवाहातील शिक्षण दिल्यास ते जिहादी आतंकवादापासून परावृत्त होईल’, असे म्हणणार्‍यांना चपराक !
  • कर्नाटक पोलिसांनी या आतंकवाद्यांच्या पाठीशी असणार्‍या संपूर्ण यंत्रणेचा शोध लावून कठोर कारवाई करणे आवश्यक !