
यवतमाळ, २० सप्टेंबर (वार्ता.) – गोशामहल (तेलंगाणा) विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास दिला जात आहे. तेलंगाणा सरकारची ही कृती राज्यघटना आणि कायदा विरोधी असून नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे हनन करणारी आहे; म्हणून टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी केंद्र शासन आणि तेलंगाणाचे राज्यपाल यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी १८ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली. ‘टी. राजासिंह यांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांची कारागृहातून मुक्तता करावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे मंगेश खांदेल यांनी केली.
या आंदोलनात योग वेदांत सेवा समिती, महिला उत्थान मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था या संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनातील मागण्यांवर २५० जणांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
क्षणचित्र – वादळी पावसाची स्थिती असतांनाही आंदोलन संपल्यावर पाऊस आला.
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !