पुद्दुचेरीतील भाजपच्या २ आमदारांनी बळकावलेली मंदिराची भूमी परत द्यावी ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या मंदिरांची भूमी ख्रिस्ती लोकप्रतिनिधी बळकावतात, हे लक्षात घ्या ! अशांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे !

गोवा : ‘सनबर्न’ आणि ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना उच्च न्यायालयाचा दणका !

हणजूण कोमुनिदादचे प्रशासक आणि गोवा सरकार यांनी ‘सनबर्न’ अन् ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना हणजूण येथील कोमुनिदादच्या भूमीत महोत्सवाचे आयोजन करण्यासाठीचे शुल्क न्यून करण्याचा घेतलेला निर्णय गोवा खंडपिठाने रहित केला !

गोवा : सत्तरी तालुक्यातील २ महिलांच्या ‘आधार कार्ड’वर समान क्रमांक

समान आधार क्रमांकामुळे मालिनी गावकर यांना विविध सरकारी योजनांखाली मिळणारे पैसे लक्ष्मी धुरी यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. ‘पंतप्रधान किसान योजने’च्या अंतर्गत पैसे न मिळाल्याने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस !

गोवा : मडगाव येथे अस्वच्छ वातावरणात असलेल्या आणि नोंदणी नसलेल्या अन्नपदार्थ उत्पादन केंद्रावर धाड

या केंद्राची यापूर्वीही तपासणी करण्यात आली होती आणि अन्नपुरवठा व्यवसाय करणार्‍यांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि २९ सप्टेंबरला पुन्हा तपासणी केली असता ते त्याच अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत आढळले.

सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. पोलिसांनी कारवाई करून धर्मांतर करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारोहात खासदार डॉ. सुधांशु त्रिवेदी यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी चर्चा केली. त्यांना समितीचा ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ, तसेच हलाल प्रमाणपत्र रहित करण्याच्या प्रक्रियेसंबंधीचे निवेदन देण्यात आले.

औषध खरेदीच्‍या निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे डिसेंबरच्‍या शेवटपर्यंत क्षयरोगावरील औषधे मिळणे अवघड !

रुग्‍णांच्‍या संदर्भात इतका अक्षम्‍य हलगर्जीपणा का ? औषधे समयमर्यादेत मिळण्‍यासाठी निविदा प्रक्रियेस कधी प्रारंभ करावा, ते सरकारने ठरवले नाही का ?

अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपीने पळण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांच्या गोळीबारात तो घायाळ !

हरदोई येथील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून परतत असणार्‍या एका अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढणारा महंमद अफझल याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पंजाबमधील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थाच्या प्रकरणी अटक

काँग्रेसचे आमदार काय करतात, हेच यातून लक्षात येते !