(म्हणे) ‘देशात ‘मनुस्मृति’ लागू झाल्यास ९५ टक्के लोक गुलाम होतील ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मनुस्मृतीचा खरा अभ्यास केला, तर ती किती उपयुक्त आहे, हेच सिद्धरामय्या यांच्या लक्षात येईल; मात्र पारंपरिक मते मिळवण्यासाठी मनुस्मृतीवर अशा प्रकारची टीका करण्याची अहमहमिका अशा नेत्यांमध्ये सध्या लागली आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

हिंदी भाषा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला एका सूत्रात बांधते ! – गृहमंत्री अमित शहा

पुणे येथे तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित केले होते. ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला हिंदी भाषा एका सूत्रात बांधते’, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

सनातन धर्माला संपवण्याचे ध्येय बाळगणार्‍या तमिळनाडूतील द्रमुक सरकारकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक अशी कारवाई होत असेल, तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही !

विश्‍वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याची ‘कर्मचारी’ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते ! – उच्च न्यायालय

वंशपरंपरागत विश्‍वस्त किंवा विश्‍वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याला मंदिरात कर्मचारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते; मात्र त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी विश्‍वस्तपदावरील दावा सोडावा लागेल, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

जे सनातन धर्माला शिव्या देत आहेत, त्यांचा वर्ष २०२४ मध्ये अंत होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

जे सनातनला शिव्या देत आहेत, त्या सर्वांचा वर्ष २०२४ मध्ये (वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत) अंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

अनंतनागमदील कोकेरनाग येथे चौथ्या दिवशीही चकमक चालू आहे. येथे एका आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. याच वेळी काश्मीरच्या बारामुला येथे सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले.

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात !

अयोध्या येथील श्रीरामजन्मूभीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराची काही छायाचित्रे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी प्रसारित केली आहेत.

कोळीकोड (केरळ) येथे निपाह विषाणुच्या संसर्गाच्या धोक्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत शैक्षणिक संस्था बंद

कोळीकोड निपाह विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. येथे निपाह विषाणुचे ६ रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या १ सहस्र ८ इतकी झाली आहे.

खेडा (गुजरात) येथे भगवान शिवाच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करणार्‍या मशिदींवरही आता बुलडोजर चालवून त्या पाडण्याची मागणी कायदाप्रेमी नागरिकांनी केली, तर चुकीचे ठरू नये !

‘इंडिया’ आघाडीकडून १४ पत्रकारांवर बहिष्‍कार

विरोधी पक्षांच्‍या ‘इंडिया’ आघाडीकडून देशातील वृत्तवाहिन्‍यांच्‍या १४ पत्रकारांवर बहिष्‍कार घालण्‍यात आला आहे.