पुद्दुचेरीतील भाजपच्या २ आमदारांनी बळकावलेली मंदिराची भूमी परत द्यावी ! – मद्रास उच्च न्यायालय

  • मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

  • ए. जॉन कुमार आणि विविलियन रिचर्ड्स अशी आहेत आमदारांची नावे !

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने पुद्दुचेरी येथील भाजपच्या २ आमदारांना येथील श्री कामची अम्मन देवस्थानम्ची २ एकर भूमी परत करण्याचा आदेश दिला आहे. ही भूमी अनधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आली होती. न्यायालयाने या संदर्भात राज्य अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाची आणि यात सहभागी लोकप्रतिनिधींची भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचाही आदेश दिला आहे. ए. जॉन कुमार आणि विविलियन रिचर्ड्स अशी या भाजपच्या आमदारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात देवस्थानम् आणि मंदिराचे एक भक्त व्ही. वेलमुरुगन यांनी याचिका प्रविष्ट केली होती.

न्यायालयाने या वेळी म्हटले की, आमदारांकडून ते खरे आणि विश्‍वसनीय लोकप्रतिनिधी असल्याची अपेक्षा केली जाते, जे लोकांच्या उत्थानासाठी प्रयत्नरत असतात. (प्रत्याक्षात मात्र बरेच लोकप्रतिनिधी विश्‍वासघातकी आणि खोटारडे असल्याचे दिसून येतात, असेच स्पष्ट होते ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या मंदिरांची भूमी ख्रिस्ती लोकप्रतिनिधी बळकावतात, हे लक्षात घ्या ! अशांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे !