भारतात अडकलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना ‘एअरलिफ्ट’ करणार ! – अमेरिका

भारतात दळणवळण बंदी घोषित झाल्यानंतर भारतातून विदेशात जाणार्‍या विमानांची उड्डाणेे रहित करण्यात आली आहेत. त्यामुळे नवी देहली, मुंबई यांसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अमेरिकी नागरिक अडकले आहेत.

स्पेनमध्ये अंत्यविधी थांबवल्याने शवागारात मृतदेह ठेवायला जागा नाही !

कोरोनामुळे युरोपातील इटली आणि स्पेन या देशांत प्रतिदिन मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तेथे रुग्णालयांत भरती होण्यापूर्वीच अनेक जणांचा मृत्यू होत आहे.

अमेरिका मित्रराष्ट्रांनाही ‘व्हेंटिलेटर्स’चा पुरवठा करणार ! – डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिका मोठ्या प्रमाणावर ‘व्हेंटिलेटर्स’ बनवणार आहे. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करूच, तसेच कोरोनाच्या विरोधातील लढ्यामध्ये आमच्या मित्रराष्ट्रांनाही आवश्यकतेप्रमाणे ‘व्हेंटिलेटर्स’चा पुरवठा करू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

इंग्लंड आणि रशिया यांनी बनवलेल्या कोरोनावरील लसींच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम !

कोरोनावर परिणामकारक औषध बनवण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्नरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इंग्लंड आणि रशिया यांनी कोरोनावर लस बनवली असून त्याची चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

कोरोनापुढे हतबल पाकिस्तान !

‘आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्य्ररेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर त्यांचे पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत, असे सांगत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी दळणवळण बंदी…

कोरोनामुळे झालेली परिस्थिती आता सुधारेल ! – नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट

कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

पाकमध्ये व्यवस्थापन यंत्रणेअभावी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्वीकृती

पाककडे जिहादी आतंकवादी बनवण्याच्या व्यतिरिक्त काहीही बनवण्याची बुद्धी, शक्ती आणि पैसे नाहीत, हेच सत्य आहे !

चीनच्या कोरोनाग्रस्त हुबेई प्रांतात हिंसाचार

गेल्या ३ मासांपासून येथे लागू केलेल्या दळणवळण बंदीमध्ये चीन सरकारने काही काळासाठी सूट दिल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढून तणाव निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे जगभरात वर्ष २००९ पेक्षाही मोठी आर्थिक मंदी येईल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

कोरोनाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या आर्थिक हानीचा फटका बसला आहे. त्यामुळे विकसनशील देशांना साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

काबूलमधील गुरुद्वारावरील आक्रमणामागे आय.एस्.आय.चा हात

येथील गुरुद्वारावर २ दिवसांपूर्वी झालेल्या आक्रमणानंतर काबूल, जलालाबाद आणि कंदहार येथील भारतीय दूतावासाला अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. गुरुद्वारापासून ३ कि.मी. अंतरावर असणारे भारतीय दूतावास आतंकवाद्यांचे लक्ष्य होते