भारतीय दूतावास होते लक्ष्य
तालिबानी आणि पाकिस्तान यांच्या विरोधात भारताने आता कठोर भूमिका घेऊन कृती करणे अपेक्षित आहे !

काबूल (अफगाणिस्तान) – येथील गुरुद्वारावर २ दिवसांपूर्वी झालेल्या आक्रमणानंतर काबूल, जलालाबाद आणि कंदहार येथील भारतीय दूतावासाला अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. गुरुद्वारापासून ३ कि.मी. अंतरावर असणारे भारतीय दूतावास आतंकवाद्यांचे लक्ष्य होते; मात्र तेथील बंदोबस्तामुळे त्यांना आक्रमण करणे शक्य न झाल्याने त्यांनी गुरुद्वारावर आक्रमण केले. प्रथम या आक्रमणामागे ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात होते; मात्र हे आक्रमण ‘हक्कानी नेटवर्क’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ यांनी घडवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय या आक्रमणामागे पाकच्या आय.एस्.आय. या गुप्तचर यंत्रणेचा हात असून त्यांनी या षड्यंत्राला ‘ऑपरेशन ब्लॅकस्टार’ असे नाव दिले होते, असे समोर आले आहे. या आक्रमणात २८ शिखांचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले. एकूण ४ आतंकवाद्यांनी ‘एके-४७ रायफल’मधून अंदाधुंद गोळीबार केला. अफगाणी सुरक्षारक्षकांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर अन्य तिघे पळून गेले. या आक्रमणाद्वारे अफगाणिस्तानातून भारताला बाहेर काढण्याचा उद्देश होता.
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण
Trump Netanyahu Dispute : ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात लेबनॉनमधील हिजबुल्लावरील इस्रायली आक्रमणांवरून वाद !
वांद्रे येथील अतिक्रमणविरोधी कारवाईचा सूड घेण्यासाठी मुंबईत आतंकवादी आक्रमणाचा कट !
कुख्यात अमली पदार्थ तस्कर मन्ना मलिक गोवा पोलीस आणि उत्तरप्रदेश विशेष कार्यदलाच्या जाळ्यात
TMC MP Kalyan Banerjee : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर जमावाकडून दगडफेक