इंग्लंड आणि रशिया यांनी बनवलेल्या कोरोनावरील लसींच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम !

नवी देहली – कोरोनावर परिणामकारक औषध बनवण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्नरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इंग्लंड आणि रशिया यांनी कोरोनावर लस बनवली असून त्याची चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

१. इंग्लंडमधील ‘ऑक्सफोर्ड विद्यापिठा’मध्ये ही लस बनवण्यात आली आहे. १८ ते ५५ वर्षे वयोगटांतील लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात येत आहे. या लसीला इंग्लंडच्या औषध प्राधिकरणाने संमती दिली आहे.

२. रशियातील ‘वेक्टर स्टेट विरोलॉजी अँड बायोटेक सेंटर’ या संस्थेकडूनही एक लस बनवली असून त्याची चाचणी प्राण्यांवर केली जात आहे. लवकरच याही लसीचा सकारात्मक परिणाम येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.