भारतात अडकलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना ‘एअरलिफ्ट’ करणार ! – अमेरिका


वॉशिंग्टन –
भारतात अडकलेल्या २ सहस्र अमेरिकेच्या नागरिकांना ‘एअरलिफ्ट’ (विमानाने नेणे) करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. भारतात दळणवळण बंदी घोषित झाल्यानंतर भारतातून विदेशात जाणार्‍या विमानांची उड्डाणेे रहित करण्यात आली आहेत. त्यामुळे नवी देहली, मुंबई यांसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अमेरिकी नागरिक अडकले आहेत.