चिनी नौका जगातील ८० देशांच्या समुद्री सीमेत करतात अवैध मासेमारी !

चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !

ब्राह्मण समाजाच्‍या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्‍यासाठी १२ फेब्रुवारीला कोल्‍हापूर येथे गोलमेज परिषद ! – मकरंद कुलकर्णी, आंतरराष्‍ट्रीय ब्राह्मण परिषद

या परिषदेत समाजासाठी काम करणार्‍या ब्राह्मण समाजातील विविध संस्‍था, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे.

मध्यपूर्वेतील ४ देशांमध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप : १९०० लोकांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी यांनी भूकंपाविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत तुर्कीयेतील लोकांच्या समवेत उभा आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी शक्य तितके साहाय्य करण्यास आम्ही सिद्ध आहोत.

पाकच्या क्वेटा येथील स्टेडियमबाहेरील बसमध्ये तालिबान्यांकडून बाँबस्फोट

या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नेपाळमध्ये मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार संकटात !

नेपाळमध्ये अनेक पक्षांना हाताशी धरून पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी युती सरकार स्थापन केले होते; मात्र सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार संकटात सापडले आहे.

शिखांच्या शस्त्र बाळगण्यावर बंदी घाला !

खलिस्तानवाद्यांकडून भारतियांवर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांना निवेदन देण्यात आले. येथील श्री दुर्गा मंदिराला गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांनी भेट दिल्यानंतर त्यांना हे निवेदन देण्यात आले.

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या १४ मंदिरांवर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड !

या घटनेविषयी जगातील कोणत्याही संघटनेकडून निषेध करण्यात आलेला नाही ! अशी घटना चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात भारतात झाली असती, तर एव्हाना ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि मुसलमान अन् ख्रिस्ती रस्त्यावर उतरले असते !

इराणमध्ये बॅडमिंटन स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय महिला खेळाडूला पदक घेतांना घालावा लागला हिजाब !

इराण कट्टर इस्लामी देश आहे. त्यामुळे भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच महिला संघटना या घटनेच्या संदर्भात शेपूट घालणार, यात आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘भारताकडून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दडपशाही चालू !’ – पाकिस्तान

भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !

केंद्रशासनाकडून २३० चिनी ॲप्सवर बंदी

यातील १३८ ॲप्स ही जुगाराच्या संदर्भातील आहेत, तर ९४ ॲप्स कर्ज उपलब्ध करण्याविषयीची आहेत. गृह मंत्रालयाने या संदर्भात आदेश दिला आहे.