भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताकडून काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दडपशाही चालू असूनही काश्मिरी नागरिक स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी त्यांचा शूर संघर्ष चालू ठेवत आहेत, असे विधान पाकिस्तानने काश्मीर एकता दिवस साजरा करतांना केले आहे.
कंगाली संभल नहीं रही… लेकिन कश्मीर चाहिए, पाकिस्तान रच रहा नई साजिश#PakistanEconomicCrisis #Kashmirhttps://t.co/HeROvO6ZSh
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) February 4, 2023
पाकिस्तान ५ फेब्रुवारी या दिवशी काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाचे औचित्य साधण्यासाठी पाकिस्तान ‘काश्मीर एकता दिवस’ साजरा करतो. काश्मीर एकता दिवसाच्या प्रचारात पंतप्रधान शाहबाज शरीफ पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत.
जम्मू-काश्मीरविषयी इस्लामी देशांच्या संघटनेच्या संपर्क गटाची संयुक्त राष्ट्रांत अनौपचारिक बैठक झाली. ज्यामध्ये अझरबैजान, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीये सहभागी झाले होते. यात त्यांनी काश्मीर एकता दिवसाचे स्मरण केले.
संपादकीय भूमिकापाकचे येत्या काळात काही तुकडे होणार आहेत, हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही, हे स्पष्ट झालेले असतांनाही पाकची काश्मीरविषयीची खुमखुमी मात्र संपलेली नाही. पाककडून तशी अपेक्षाही करता येत नसल्याने त्याला त्याच्या कर्माची फळे भोगावीच लागणार आहेत ! |