नेपाळमध्ये मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार संकटात !

पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड

काठमांडू – नेपाळमध्ये साधारण मासाभरापूर्वी अनेक पक्षांना हाताशी धरून पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी युती सरकार स्थापन केले होते; मात्र सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आर्.एस्.पी.ने) पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार संकटात सापडले आहे.

आर्.एस्.पी. हा पक्ष नेपाळमधील चौथा सर्वांत मोठा पक्ष असून संसदेत त्याचे २० खासदार आहेत. पक्षाच्या बैठकीत पक्षप्रमुख रवि लमिछाने यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे घोषित केले. दुहेरी नागरिकत्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लमिछाने यांना संसदेसाठी अपात्र ठरवले होते; मात्र त्यांनी पुन्हा नागरिकत्व मिळवले होते. लमिछाने यांना गृहमंत्रीपद हवे होते; मात्र प्रचंड यांनी ते न दिल्यामुळे आर्.एस्.पी.ने पाठिंबा काढून घेतल्याचे बोलले जात आहे.