पदक घेणार्या महिला खेळाडूंना हिजाब घालण्याचे आधीच स्पष्ट करण्यात आल्याचा आयोजकांचा दावा !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोक आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)
तेहरान (इराण) – भारतीय बॅडमिंटन खेळाडू तान्या हेमंत हिने येथील ३१ वी इराण फज्र इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली. तिला सुवर्णपदक देतांना हिजाब घालण्यास बाध्य करण्यात आले. स्पर्धेच्या आयोकांनी सांगितले, ‘आम्ही आधीच स्पष्ट केले होते की, पदक घेण्यासाठी येणार्या तरुणीला हिजाब घालणे अनिवार्य असणार आहे.’
भारत की तान्या हेमंत को ईरान में मेडल लेने के लिए पहनना पड़ा हिजाब- रिपोर्ट#TanyaHemanth #Shuttler #Hijab #Iran https://t.co/HajaySfr7c
— Dainik Jagran (@JagranNews) February 6, 2023
विशेष म्हणजे महिलांचे सामने पुरुषांना पहाण्यास अनुमती देण्यात आली नव्हती. येथे प्रवेशद्वारावरच ‘पुरुषांना अनुमती नाही’, असा फलक लावण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाइराण कट्टर इस्लामी देश आहे. त्यामुळे भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच महिला संघटना या घटनेच्या संदर्भात शेपूट घालणार, यात आश्चर्य ते काय ? |