अधिकारी नसल्याने यंदा मिठाईतील भेसळ पडताळणारी यंत्रणाच नाही !

अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवडणुकीच्या कामाचे दायित्व सांभाळून भेसळ रोखण्यासाठी भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले असल्याची माहिती अन्न अन् औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी दिली.

शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा ‘स्कॉच’ पुरस्काराने सन्मान !

का खासगी संस्थेकडून हा पुरस्कार चालू करण्यात आला आहे. तो देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे, असा या संस्थेचा दावा आहे.

पुणे शहरातील विनाअनुमती फटाका विक्रेत्यांवर गुन्हे नोंद !

अशा फटाका विक्रेत्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? नागरिकांकडून तक्रारी येण्याची वाट का पहात असतात ?

आंबेगाव बुद्रुक (पुणे) येथील शिवसृष्टी येथे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला !

पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’द्वारे ही ‘शिवसृष्टी’ साकारली जात आहे.

गोवेकरांसाठी ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ’ हे श्रद्धास्थान ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

डॉ. प्रमोद सावंत हे तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता त्यांचा सत्कार झाल्यावर ते बोलत होते.

दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषण होते, अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी आणि अंनिसवाले वर्षभर कुठे असतात ?

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा प्रश्न

तिलारी घाटात पकडलेल्या ट्रकमध्ये होते १० टन गोमांस : २ जणांवर गुन्हा नोंद

तिलारी घाटातून गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक स्थानिक ग्रामस्थांनी २८ ऑक्टोबर या दिवशी पकडला होता. या ट्रकमध्ये १५ लाख रुपये किमतीचे १० टन गोमांस, ७ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ४ लाख रुपये किमतीची चारचाकी (कार), असा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला आहे.

देखभाल दुरुस्ती कालावधीतील ठेकेदार कृष्णा खाडे १ वर्षासाठी काळ्या सूचीत !

विभागीय कार्यालय क्रमांक १ अंतर्गत ‘रचनाकार हौसिंग सोसायटी’ येथील देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्याचा ठेकेदार कृष्णा खाडे याला १ वर्षासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी काळ्या सूचीत टाकले आहे.

कार्तिकी यात्रेच्या निमित्त पंढरपूर शहरात वाहतूक मार्गात पालट !

अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर मोहोळकडून येणारी सर्व वाहने करकंब क्रॉस रोड (अहिल्यादेवी चौक) तीन रस्ता मार्गे विसावा येथे थांबतील. ६५ एकर येथे केवळ दिंडी आणि पालखी यांची वाहने थांबतील.

कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्रलेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन !

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कापड व्यापारी, गोड खाऊ विकणारी दुकाने, भेटवस्तूंची दुकाने, ‘मोबाईल शॉपी’ यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे दीपावली सणानिमित्त खरेदीसाठी येणार्‍या लोकांना ‘स्टिकर्स’द्वारे मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे.