(म्हणे) गोमंतकीय जनता काँग्रेसवर विश्‍वास ठेवील, असा पक्षात पालट करू ! – दिनेश गुंडू राव, काँग्रेस

काँग्रेस पक्षाने पक्षाचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीची नुकतीच स्थापना केली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर दिनेश गुंडू राव बोलत होते.

पाकिस्तान वर्ष २०२१ पाळणार ‘गाय वर्ष’ !

नुसते ‘गाय वर्ष’ पाळण्याऐवजी गोहत्या होणार नाहीत, यासाठी पाकने प्रयत्न केले म्हणजे मानता येईल !

सांगली महापालिकेच्या पुस्तक बँकेला राजेश नाईक फाऊंडेशन वाचनालयाकडून १०१ पुस्तकांची भेट

फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विमा सल्लागार संदीप आपटे यांचा विमा व्यवसायातील उत्तम कामगिरीविषयी आयुक्त कापडणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उद्योगपती अदानी शरद पवार यांच्याकडे येऊन गेल्यानंतर सरकारने वीज देयक माफ न करण्याचा निर्णय घेतला !

वीज देयक माफ न करण्याचा निर्णय वीज आस्थापनांसमवेत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेनदेन झाल्याशिवाय हे झाले नसेल. सर्व आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी केला.

केंद्रीय अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला दिलासा, मूलभूत प्रश्‍न दुर्लक्षित राहिल्याची उद्योजकांची खंत

दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर उद्योगाला गती मिळाली आहे; परंतु कापूस, सुताचे चढे भाव आणि कापडाला अपेक्षित न मिळणारी किंमत यामुळे एकूणच या क्षेत्रातील उलाढाल अल्प होत आहे.

राज ठाकरे यांना जामीन संमत

वाशी पथकर नाका तोडफोड केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन न्यायालयाने ६ फेब्रुवारी या दिवशी १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर संमत केला. या वेळी राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करून त्यांच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद !

तक्रारनुसार अमन चढ्ढा, मनीष आनंद यांच्यासह सहा जणांवर सी.आर्.पी.सी. १५६ (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

येणार्‍या जनगणनेत लिंगायत बांधवांनी त्यांचा धर्म केवळ ‘हिंदु धर्म’असाच लिहावा ! – डॉ. विजय जंगम, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

विरोधकांना खणखणीत चपराक देत शिवाचार्य आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

राज्यशासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानात पुणे क्षेत्रीय विभागात कोल्हापूर जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर

या अभियानातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा परिषद कोल्हापूरसह दोन्हीही विजेत्या पंचायत समितीचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.