
पुणे – कन्नडचे (जिल्हा संभाजीनगर) माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करून त्यांच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात नोंद केला आहे. याविषयी ३७ वर्षीय महिलेने तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यानुसार अमन चढ्ढा, मनीष आनंद यांच्यासह सहा जणांवर सी.आर्.पी.सी. १५६ (३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजय चढ्ढा यांनी जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग करून त्यांना थोबाडीत मारल्याची तक्रार तक्रारदारांनी कोर्टात सादर केली. त्या अर्जानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
आमदार जाधव यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण करून अन्य एका वाहनाला धडक दिल्याची तक्रार चढ्ढा यांनी केली होती. त्या वेळी मला ही मारहाण झाली असे जाधव यांनी सांगूनही त्यांची तक्रार पोलिसांनी प्रविष्ट केली नाही. त्यामुळे जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन