वसईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या दोघांना अटक

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !

मी जी शांतता अनुभवत आहे, ती भयाण आहे ! – पोप फ्रान्सिस

इतिहासात प्रथमच पोप यांच्यावर एकट्याने प्रार्थना करण्याची वेळ

इटलीत कोरोनाचे थैमान, आतापर्यंत १० सहस्र २३ जणांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६ लाख ६३ सहस्र ७४० असून मृत्यू झालेल्यांची संख्या ३० सहस्र ८७९ इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४२ सहस्र १८३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारत सिद्ध करणार ‘हजमत सूट’ !

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि…

वैद्यकीय सुविधांसाठी अमेरिकेकडून भारताला २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य

अमेरिकेने भारतासह अन्य ६४ देशांना १३ अब्ज रुपये साहाय्य करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अमेरिकेकडून भारताला २.९ मिलियन डॉलरर्स, म्हणजेच २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य मिळणार आहे.

देशात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण

देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता  ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मनात भीती निर्माण झाली, तर रोगप्रतिकारशक्ती न्यून होते. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना स्वस्त धान्य उपलब्ध

या योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा येथील शेतकर्‍यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या ३ मासांकरिता सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ प्रतिव्यक्ती ५ किलो उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक येथे विनाकारण दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांसाठी दुचाकी जप्त होणार

दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वारंवार सांगूनही दुचाकींचा वापर सर्रास चालूच असल्यामुळे आता विनाकारण कोणी दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांकरिता दुचाकी जप्त होणार आहे.