मी जी शांतता अनुभवत आहे, ती भयाण आहे ! – पोप फ्रान्सिस

इतिहासात प्रथमच पोप यांच्यावर एकट्याने प्रार्थना करण्याची वेळ

व्हॅटिकन सिटी – येथील चौक, रस्ते आणि शहरे यांमध्ये मी एका गडद संकटाची छाया अनुभवत आहे. हे संकट जीवघेणे आहे. जी शांतता मी अनुभवत आहे, ती भयाण असून काळजाचा ठोका चुकवणारी आहे’, असे विधान ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केले. ख्रिस्त्यांचे प्रमुख धर्मस्थळ असलेल्या ‘सेंट पीटर स्क्वेअर’ येथे २८ मार्चला सायंकाळी आयोजित केलेल्या प्रार्थनेच्या वेळी ते बोलत होते. ‘लवकरच या संकटाचे काळे ढग दूर होतील आणि सर्व निरभ्र होईल’, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पोप फ्रान्सिस यांनी येथे एकट्याने उभे राहून प्रार्थना केली. पोप यांना एकट्याने प्रार्थना करावी लागण्याची ही सेंट पीटर स्क्वेअरवरच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. एरव्ही या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.