वैद्यकीय सुविधांसाठी अमेरिकेकडून भारताला २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने भारतासह अन्य ६४ देशांना १३ अब्ज रुपये साहाय्य करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अमेरिकेकडून भारताला २.९ मिलियन डॉलरर्स, म्हणजेच २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य मिळणार आहे. ‘भारतामध्ये ‘लॅब’च्या उभारणीसह इतर वैद्यकीय सुविधांसाठी ही रक्कम त्याला देण्यात आली आहे’, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत २ सहस्र २२७ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत २ सहस्र २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ लाख २३ सहस्र ७५० इतकी झाली आहे.