इटलीत कोरोनाचे थैमान, आतापर्यंत १० सहस्र २३ जणांचा मृत्यू

रोम (इटली) – कोरोना विषाणूने इटलीत थैमान घातले असून आतापर्यंत येथे १० सहस्र २३ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे ९२ सहस्र ४७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगभरात एकूण ३० सहस्र ८७९ जणांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६ लाख ६३ सहस्र ७४० असून मृत्यू झालेल्यांची संख्या ३० सहस्र ८७९ इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४२ सहस्र १८३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

कोरोनाचा युरोपला विळखा

१. युरोपमधील स्पेनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ७३ सहस्र २३५ असून तेथे आतापर्यंत ५ सहस्र ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

२. जर्मनीत ५७ सहस्र ६९५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून तेथे ४३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

३. कोरोनामुळे फ्रान्समध्ये २ सहस्र ३१४, तर ब्रिटनमध्ये १ सहस्र १९ जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत.