मुंबईमध्ये नात आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

अशा प्रकारच्या घटना हे समाजातील वाढत्या व्यभिचाराचे लक्षण आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच समाजाची झालेली ही अधोगती लक्षात घेऊन आतातरी नैतिक शिक्षण देणार्‍या शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा !

भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण

सचिन यांनी याविषयी सामाजिक संकेतस्थळावर माहिती दिली.

संभाजीनगर येथे दळणवळण बंदीच्या भीतीने १० टक्के परप्रांतीय कामगार गावांकडे रवाना !

कोरोनामुळे पुन्हा मोठी ‘दळणवळण बंदी’ घोषित होण्याच्या भीतीपोटी वाळूज औद्योगिक परिसरातून परप्रांतीय कामगारांची ४-५ कुटुंबे प्रतिदिन सर्व साहित्य घेऊन खासगी वाहनाने मूळ गावी परत जात आहेत.

कराड शहरात ३४ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) !

शहरात गत ५ ते ६ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कराड शहर परिसरात ३४ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) निर्माण करण्यात आले आहेत.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर

येथील शासकीय रुग्णालयात आकस्मिक रोग विभागात एकाच खाटावर २ रुग्णांना झोपावे लागत आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असतांना खाट मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू रहाणार !

‘ऑनलाईन’ बुकिंग केलेल्या दीड सहस्र भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या विक्रीचे नियोजन करावे, या मागणीसाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मूर्तीकारांना आवाहन करून शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगात रंगवलेल्या मूर्तीचे महत्त्व सांगून अशा मूर्ती विक्रीसाठी येतील, याचे नियोजन करावे, अशी मागणी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली.

सांगली महापालिका क्षेत्रात ५ खासगी रुग्णालये कोरोना रुग्णालय म्हणून चालू करा ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

सांगलीतील मेहता रुग्णालय आणि कल्लोळी रुग्णालय, मिरजेतील भारती, वॉनलेस आणि सेवासदन या रुग्णालयांचा समावेश आहे. ही रुग्णालये शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.

निवडणुकीला उपस्थित कोरोनाबाधित आरोग्य कर्मचारी निलंबित होणार !

कोरोनाबाधित असतांनाही २५ मार्च या दिवशीच्या पतसंस्थेच्या निवडणुकीस उपस्थित असलेल्या जत येथील आरोग्य कर्मचार्‍याच्या निलंबनाचे आदेश  मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले.

शिरवळ (जिल्हा सातारा) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार शिरवळमध्ये (शहर) प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.