शिरवळ (जिल्हा सातारा) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

सातारा, २८ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार शिरवळमध्ये (शहर) प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

२७ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत शिरवळमध्ये दळणवळण बंदी जाहीर करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार आणि ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांनी दिली आहे. प्रशासनाच्या या आदेशामुळे शिरवळ येथील नागरिक आणि व्यापारी यांच्यामध्ये निराशेचे सूर दिसून येत आहे. प्रशासनाने काढलेल्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.